पिंपरी पोलिस आयुक्तालयास पुण्यातून दीड हजार कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - नव्याने झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ पुरविले आहे. त्यामध्ये आणखी 200 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.

पुणे - नव्याने झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ पुरविले आहे. त्यामध्ये आणखी 200 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजास स्वातंत्र्य दिनापासून सुरवात झाली. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, वाहने यांसारख्या प्रत्येक बाबीमध्ये कमतरता असतानाही आयुक्तालय घाईघाईने सुरू करण्याचा घाट का घातला, अशा चर्चेला उधाण आले आहे. मात्र पुणे पोलिस आयुक्तालय प्रशासनाने योग्य ते सहकार्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले. पिंपरीला पुणे पोलिस आयुक्तालयाने दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ दिले आहे. त्यामुळे आता पुणे आयुक्तालयाकडे साडेआठ हजार इतकेच मनुष्यबळ शिल्लक राहणार आहे. त्यामध्ये नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेनंतर आणखी 250 जणांची भर पडले.

पिंपरीला पुणे पोलिस आयुक्तालयाने दिलेले मनुष्यबळ
पोलिस उपायुक्त - 1, सहायक पोलिस आयुक्त - 1, पोलिस निरीक्षक - 26, सहायक पोलिस निरीक्षक - 18, पोलिस उपनिरीक्षक - 67, सहायक पोलिस उपनिरीक्षक - 115, हवालदार - 361, पोलिस नाईक - 425, पोलिस कॉन्स्टेबल - 616. (आणखी 200 पोलिस कर्मचारी देणार आहेत).

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय अद्याप झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्‍यक गाडी, एस्कॉर्ट, संरक्षण, व्हीआयपी, आरसीपी यासाठीचे मनुष्यबळ सध्या पुणे पोलिस मुख्यालयाकडे राहील.
- शेषराव सूर्यवंशी, पोलिस उपायुक्त, प्रशासन विभाग.

Web Title: Pimpri Police Commissionerate 1500 employee supply by pune