छेडछाड रोखण्यासाठी पिंपरी पोलिसांचे पथक

Tampering
Tampering

पिंपरी - हैदराबाद येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात छेडछाड प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. हे पथक शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच खासगी क्‍लासेसच्या परिसरात गस्त घालून छेडछाड रोखणार आहे. 

हैदराबाद येथे तरुणीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. दरम्यान, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासह त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पावले उचलली आहेत. पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सोमवारी (ता. ९) दुपारी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आयुक्तालयात बैठक बोलावून त्यामध्ये विद्यार्थिनींसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी सजग राहण्याच्या सूचना दिल्या.

यासह प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय एक छेडछाड प्रतिबंधक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात एक अधिकारी, दोन महिला कर्मचारी, दोन पुरुष कर्मचारी यांच्यासह गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असेल. हे पथक ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये तसेच खासगी क्‍लासेसच्या ठिकाणी गस्त घालणार आहे. या बैठकीस उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com