पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून तडीपार गुंडावर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पिंपरी - पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्‍याने कोयता व चॉपरने एका तडीपार गुंडावर वार केले. खराळवाडी येथील भगवरगीता मंदिराजवळ सोमवारी (ता. 15) रात्री ही घटना घडली. याबाबत गणेश शिंगाडे (वय 28, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

दिनेश शिंगाडे असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. या प्रकरणातील विठ्ठल मारुती बनपट्टे (वय 35), कमलेश युवराज बनपट्टे (वय 24), गणेश राजू बनपट्टे (वय 26), जॉर्ज विल्यम फ्रान्सिस (वय 35, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) आणि अविनाश राजू चौगुले (वय 22, रा. वडारवाडी, गोखलेनगर, पुणे) या पाच आरोपींना अटक केली. तर संजय बनपट्टे (वय35) व राजू बनपट्टे (वय 45, दोघेही रा. खराळवाडी) हे दोघे फरार आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी खराळवाडी येथील घरी आला होता. आईला भेटून तो परत जात असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून त्याच्यावर कोयता व चॉपरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या काकूच्याही हातावर वार केले. या प्रकरणीचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

Web Title: pimpri pune news attack on gund