रिंगरोड रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

पिंपरी - हजारो घरांचा विध्वंस करणारा रिंगरोड रद्दच करा, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीयांच्या शहरांध्यक्षांनी केली. घर बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, शेकापचे हरीश मोरे उपस्थित होते.

आरक्षणातील बांधकामे वगळता सर्व बांधकामे नियमित करणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केल्याने त्यांना परिणाम भोगावे लागल्याचे या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले. त्यास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही दुजोरा दिला.

कोण काय म्हणाले...

नागरिकांच्या गरजेनुसार आरक्षणात बदल केला. दाट लोकवस्तीत हस्तक्षेप नको. भाजप हुकूमशाहीने वागत आहे. बाधित नागरिकांना आमदारांनी अपमानास्पद वागणूक दिली.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

शेजारीच प्रशस्त रस्ता असताना वेगळ्या रस्त्याची आवश्‍यकता आहे का, प्रत्येक गोष्टीत विरोधकांचा हात असल्याचा आरोप भाजपवाले करतात. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाचा विसर भाजपला पडला आहे.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

रिंगरोडच्या आरक्षणात साडेअकरा कोटींचे उद्यान चालते. मग गरिबांची घरे का नाही? प्राधिकरणाच्या डीपीतील सर्व बांधकामे नियमित झाली पाहिजेत.
- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना

रिंगरोडबाधित परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांना भयभीत करणाऱ्या योजनेला आमचा विरोध आहे. आम्ही येथील नागरिकांच्या पाठीशी सर्वशक्‍तीनिशी उभे राहू.
- सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे

श्रेयाकरिता भाजपकडून गलिच्छ राजकारण केले जात आहे. सत्ता आल्यास घरे अधिकृत करण्यासाठी पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असे सांगणारे भाजप सरड्यासारखा रंग बदलत आहे. टीडीआरच्या मलईसाठी रिंगरोडचा घाट घातला जात आहे. प्राधिकरणाचा विकास आराखडा कालबाह्य झाला असून तो रद्द करावा.’’
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते

गेल्या ३० वर्षांपासून हे लोक येथे राहत आहेत. बारा वर्षे ‘कसेल त्याची जमीन’ हे धोरण सरकारचे असल्याने घरे नागरिकांच्या नावावर केली पाहिजेत.
- देवेंद्र तायडे, शहराध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

शहराचा विकास झाला पाहिजे. मात्र नागरिकांची घरे पाडून होणाऱ्या विकासाला विरोध आहे. प्राधिकरणाच्या विकास आराखड्याची मुदत संपुष्टात आली आहे.
- हरीश मोरे, शहराध्यक्ष, शेकाप

Web Title: pimpri pune news cancel ring road