महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

याप्रकरणी संकेत चंद्रकांत मुंदडा (वय. 25 रा. प्लॉट नं. एफ-6, धर्मा अपार्टमेंट, पिंपरीगाव) आणि दीपक नाथाजी पाटील ऊर्फ दीपक नाथाजी रयभान (वय 35, रा. पायल क्‍लासिक, गोंधळेनगर, हडपसर) यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला. याबाबत प्रथमेश जाधव (वय 25, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यासाठी सहा मार्च 2016 रोजी साडेतीन लाख रुपये उकळले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: pimpri pune news cheating