हेल्मेट सक्‍तीला वाहन चालकांचा विरोध

संदीप घिसे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पिंपरी - वाहतूक पोलिसांनी गुरुवार (ता.7) पासून "नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन' या अंतर्गत पिंपरी चौक ते शगुन चौक दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यावेळी हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई केली. या कारवाईला दुचाकी चालकांनी तीव्र विरोध करीत पोलिसांशी वाद घालता.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या जटिल होत चालली आहे. वाहन चालकांचे प्रबोधन करूनही त्यापैकी अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अशा बेशिस्त वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांच्यावतीने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुरुवारपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ठिकाणी 28 वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरवात झाली.

"नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट परिधान न करणे, दुचाकीवरून ट्रीपलसीट जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आदी वाहतुकीच्या नियमभंग प्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पुलावर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरवात झाली. यावेळी हेल्मेट न घातलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला वाहन चालकांनी तीव्र विरोध करा.

प्रथम प्रबोधन मग कारवाई करा
वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाईला सुरवात केल्यानंतर हेल्मेट सक्‍तीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे वाहन चालकांचे म्हणणे होते. मात्र हेल्मेट घालणे हा नियम असून याबाबत वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्याचे सांगत वाहतूक पोलिसांनी दै.सकाळमध्ये आलेली बातमी वाहन चालकांना दाखवत होते.

Web Title: pimpri pune news crime by traffic police on vehicle