डेअरी फार्म येथील नियोजित उड्डाण पुलाचे काम लवकरच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पिंपरी - महामार्ग व पिंपरीगाव यांना जोडणाऱ्या डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली. येत्या तीन महिन्यांत हे काम सुरू करण्याचे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महापालिकेमध्ये चाबुकस्वार व आयुक्तांची बैठक झाली. शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुटे, मीनल यादव बैठकीला उपस्थित होते. 

चाबुकस्वार म्हणाले, ‘‘पुणे-मुंबई महामार्गावरून थेट पिंपरी गावाला जोडणाऱ्या मिलिटरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीची मागणी गेली १२ वर्षे प्रलंबित आहे. ५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. उड्डाण पूल उभारण्यासाठी जागा ताब्यात घ्यावी लागेल. त्यापोटी संरक्षण खात्याला पालिकेने शुल्कही दिले आहे. संरक्षक भिंत व फार्म विकसित करण्याच्या लष्कराच्या मागण्या तत्त्वतः मान्य करून तातडीने हा विषय मार्गी लावण्याचे आयुक्तांनी मान्य केले.’’ 

ते म्हणाले, ‘‘आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात वाहतुकीची कोंडी होते. पादचाऱ्यांसाठी महामार्गावरील संत तुकारामनगर येथील स्कायवॉक हलवून तो आकुर्डीला स्थलांतरित करण्याचे या वेळी ठरले. पिंपरी गावातील सेक्‍टर क्रमांक एक आणि दोन येथे भव्य क्रीडांगण उभारणीसाठी तातडीने जागा ताब्यात घेणे, प्राधिकरणातून चिंचवड स्टेशनला पांढरकर चाळ मार्गे जोडणाऱ्या रस्त्याचे काम, पीएमपीच्या आरक्षित जागा त्यांना नको असल्यास त्या जागा महापालिकेने ताब्यात घेणे याबाबत चर्चा झाली. त्या कामांचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.’’ 

कॅम्पातील वाहतुकीवर तोडगा हवा
पिंपरी कॅम्पातील वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन काळेवाडी ते आंबेडकर कॉलनी (रिव्हर रोड) असा पवना नदीवर पूल उभारण्यासाठी सर्व्हे करण्याची सूचना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या वेळी केली. असा पूल झाल्यास रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड परिसरातील नागरिकांची सोय होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news dairy farm over bridge work