‘मेट्रो’ रक्तपेढीची जिल्हा रुग्णालयाला प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पिंपरी - पुणे जिल्ह्यातील वैद्यक क्षेत्रात मानबिंदू ठरू पाहणाऱ्या औंध येथील जिल्हा रुग्णालय अद्यापही मेट्रो रक्तपेढीच्या (मेट्रो ब्लड बॅंक) प्रतीक्षेतच आहे. या वर्षी तरी आमची प्रतीक्षा संपणार का? असा सवाल रुग्णालयीन अधिकारी विचारत आहेत. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वेळकाढू, सुस्त कारभारामुळेच रक्तपेढीची प्रतीक्षा लांबली आहे. परिणामी, जिल्ह्यातील लाखो गरीब व गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याची खंतही रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

पिंपरी - पुणे जिल्ह्यातील वैद्यक क्षेत्रात मानबिंदू ठरू पाहणाऱ्या औंध येथील जिल्हा रुग्णालय अद्यापही मेट्रो रक्तपेढीच्या (मेट्रो ब्लड बॅंक) प्रतीक्षेतच आहे. या वर्षी तरी आमची प्रतीक्षा संपणार का? असा सवाल रुग्णालयीन अधिकारी विचारत आहेत. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वेळकाढू, सुस्त कारभारामुळेच रक्तपेढीची प्रतीक्षा लांबली आहे. परिणामी, जिल्ह्यातील लाखो गरीब व गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याची खंतही रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम खाते ढिम्मच असल्याचा आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरापासून नियोजित मेट्रो ब्लड बॅंकेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून ते रुग्णालयाच्या ताब्यात द्यावे, असा पत्रव्यवहार मी बांधकाम विभागाशी करत आहे. मात्र, या विभागाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

अखेरीस मागील आठवड्यात मी थेट पीडब्ल्यूडीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यास पत्र पाठविले. त्यामध्ये मी मेट्रोच्या विलंबास पीडब्ल्यूडीला जबाबदार धरले. त्याची दखल घेत पीडब्ल्यूडीने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. सध्या छतामधून तसेच भिंतीमधून होणारी पाणीगळती रोखण्याचे काम सुरू आहे. 

त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्यानंतर रंगरंगोटी, वीजयंत्रणेची दुरुस्ती व तपासणी करण्यात येईल. पीडब्ल्यूडीने सर्व कामांची पूर्तता करून जागा आमच्या ताब्यात दिल्यानंतर मेट्रोसाठी उपलब्ध सर्व यंत्रसामग्रीचे मूल्यमापन करून घेतले जाईल. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाशी (एफडीए) संपर्क साधून त्याची पाहणी करून घेतली जाईल. एफडीएने मंजुरी दिल्यानंतर मेट्रो सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने केली जाईल. शक्‍य झाल्यास या आठवड्यामध्ये पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेणार आहे.’’

गळती कायम
‘मेट्रो रक्तपेढी’ची आवश्‍यकता ओळखून आरोग्य खात्याने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ती सुरू करण्याची घोषणा केली. त्यातील पहिली रक्तपेढी औंध जिल्हा रुग्णालयात सुरू करण्याचे निश्‍चितही झाले. २०१२मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले व २०१३ ला पूर्ण झाले. रक्तपेढीसाठी अत्यावश्‍यक सातारा जिल्हा रुग्णालयात पडून असलेली उपकरणेही मागविली. दरम्यान, रक्तपेढीतील स्लॅब कोसळण्यास सुरवात झाली. पाठोपाठ छतामधून गळतीही सुरू झाली. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे बसविण्याचे काम थांबविले. स्लॅबच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून सहा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मागविला. त्यातून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून छताच्या दुरुस्तीसह वॉटरप्रूफिंगही केले. इलेक्‍ट्रिसिटीही बदलून घेतली गेली. त्यामध्ये दोन वर्षे वाया गेले. गळती मात्र कायम राहिली.

मेट्रो रक्तपेढीचे फायदे
रक्तातील प्लाझ्मा, प्लेटलेट्‌स, फ्रेश प्लाझ्मा असे पाच घटक वेगळे करता येतात. 
रक्ताची एक पिशवी दोन ते तीन रुग्णांचे प्राण वाचवू शकते. 
या रक्तपेढीमध्ये एक हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करता येणार 

Web Title: pimpri pune news district hospital waiting metro blood bank