बुलेट ट्रेनपेक्षा करा रेल्वेचे सक्षमीकरण - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पिंपरी - 'अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या केंद्र सरकारने बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यावर भर द्यावा. रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करावे. बुलेट ट्रेनचा फायदा फक्त गुजरातला होणार आहे. महाराष्ट्राच्या हाती काहीच येणार नाही,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

मुंबई येथील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. 29) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, 'रेल्वेची परिस्थिती भीषण असल्याने अशा दुर्घटना घडतात. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वेमधील सुधारणांसाठी आग्रही होते. त्यांचे बुलेट ट्रेनला प्राधान्य नसल्याने त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्रिपद दिले गेले, अशा बातम्या होत्या.''

Web Title: pimpri pune news Empower the train with the bullet train