पीएमपीला निधी देणार - सावळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

बसआगार, स्थानकांसाठी तीन ठिकाणी जागा देण्याची जगताप यांची ग्वाही

पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरात तीन ठिकाणी पीएमपीला बसआगार आणि स्थानकांसाठी जागा देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले.

महापालिकेकडून पीएमपीला निधी देणार असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीमधील वाद आता संपला आहे.

महापौर नितीन काळजे, जगताप, सावळे आणि पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची सोमवारी सायंकाळी स्वारगेट येथील पीएमपी कार्यालयात बैठक झाली. तेथे पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक बसवाहतुकीच्या समस्या सोडविण्यासंदर्भात सुमारे दोन तास चर्चा झाली. त्या वेळी सावळे आणि मुंढे यांच्यात गेले दीड महिना सुरू असलेला वादही चर्चा करून संपविण्यात आला.

‘पीएमपीकडून अपेक्षा पिंपरी-चिंचवडच्या’ ही वृत्तमालिका ‘सकाळ’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केली. त्याला वाचकांचा आणि प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि मुंढे यांच्यातील वादही मिटला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील वाद मिटविण्याचा दबाव वाढला होता. मुंढे यांनी चर्चेचे निमंत्रण दिले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पदाधिकारी सोमवारी मुंढे यांच्याकडे गेले. 

पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बससेवा वाढविण्यासाठी नवीन ८० मिडी बसगाड्या देण्यात येतील. गाड्यांची खरेदी केल्यानंतर हा प्रश्‍न सोडविण्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. काही जुने मार्ग चुकीचे असल्याने त्यात सुधारणा करण्याचा मानस असल्याचे मुंढे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड भागातील बसआगार आणि स्थानकाच्या जागा देण्याची मागणी मुंढे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्या संदर्भात लक्ष घालून तीन जागा लवकरच पीएमपीला देण्यात येतील, असे आश्‍वासन जगताप यांनी त्यांना दिले.

पीएमपीच्या पिंपरी-चिंचवड भागातील समस्यांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्रुटी दूर करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. आम्ही विचारलेली माहिती लेखी स्वरूपात मिळाली. त्यामुळे, पीएमपीचे अनुदानाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्याचे ठरविले. एचपीसीएल कंपनीकडून प्रतिलिटर ८० पैसे कमी दराने डिझेल खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोटा वाढण्याची कारणे, पीएमटी-पीसीएमटीच्या विलीनीकरणानंतरचे प्रश्‍न, नादुरुस्त बस, महिलांसाठी स्वतंत्र बस आणि महिलांसाठी आरक्षित जागा या प्रश्‍नांबाबत चर्चा झाली.
- सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती

Web Title: pimpri pune news fund to pmp