यंदापासून पुन्हा गणेश फेस्टिव्हल - महापौर नितीन काळजे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पिंपरी - महापालिकेच्या माध्यमातून गणेशोत्सवात पूर्वी घेण्यात येत असलेला पिंपरी-चिंचवड महोत्सव आता गणेश फेस्टिव्हल या नावाने यंदापासून पुन्हा सुरू केला जाणार आहे. महापालिका स्थायी समिती सभेत याबाबत गुरुवारी चर्चा झाली. महापौर नितीन काळजे यांनी हा महोत्सव महापालिकेतर्फे घेण्यात येईल, अशी घोषणा गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. 

पिंपरी - महापालिकेच्या माध्यमातून गणेशोत्सवात पूर्वी घेण्यात येत असलेला पिंपरी-चिंचवड महोत्सव आता गणेश फेस्टिव्हल या नावाने यंदापासून पुन्हा सुरू केला जाणार आहे. महापालिका स्थायी समिती सभेत याबाबत गुरुवारी चर्चा झाली. महापौर नितीन काळजे यांनी हा महोत्सव महापालिकेतर्फे घेण्यात येईल, अशी घोषणा गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. 

महापालिकेच्या माध्यमातून १९९६ मध्ये पिंपरी-चिंचवड महोत्सव सुरू करण्यात आला. २००३ पर्यंत महापालिकेच्या माध्यमातून हा महोत्सव घेण्यात येत होता. २००४ नंतर मात्र महापालिकेने हा महोत्सव घेणे बंद केले. त्यानंतर यामध्ये पुढाकार घेत पिंपरी-चिंचवड सोशल क्‍लबने हा महोत्सव सुरूच ठेवला; मात्र त्यामध्ये महापालिकेचा सहभाग नव्हता. २०१४ पासून गणेशोत्सवाच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड महोत्सव न घेता डिसेंबर, जानेवारी महिन्यात घेण्यात येऊ लागला. 

महापालिकेचे गणेश फेस्टिव्हल यंदापासून पुन्हा सुरू करावे, अशी सूचना स्थायी समिती सभेत अध्यक्षा सीमा सावळे, सदस्य आशा शेंडगे, वैशाली काळभोर, राजू मिसाळ, अमित गावडे आदींसह अन्य सदस्यांनी केली. संबंधित महोत्सवात लोककला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे, असे महापालिका प्रशासनाला सुचविण्यात आले. 

दरम्यान, गणेश फेस्टिव्हल महापालिकेतर्फे यंदापासून सुरू केले जाणार असल्याचे सूतोवाच महापौर काळजे यांनी केले. काळजे म्हणाले, ‘‘गणेश महोत्सव तीन ते पाच दिवसांचा असेल. त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील. स्थानिक कलाकारांना विशेष वाव देण्यात येईल. पिंपरी, चिंचवड, भोसरी अशा तिन्ही पट्ट्यांत महोत्सवाचे कार्यक्रम घेण्याबाबत नियोजन केले जाईल. महोत्सवाची रूपरेषा लवकरच ठरविण्यात येणार आहे.’’

रसिकांसाठी ठरेल पर्वणी
महापालिकेतर्फे सध्या स्वरसागर संगीत महोत्सव घेण्यात येतो. स्वरसागर महोत्सव हा मुख्यत्वे शास्त्रीय संगीताला वाहिलेला असतो. त्यातुलनेत गणेश फेस्टिव्हलमध्ये शास्त्रीय संगीताबरोबरच लोककला, लोकसंगीत आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम घेणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे हे गणेश फेस्टिव्हल रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: pimpri pune news ganesh festival in pimpri-chinchwad