बिल थकल्याने गॅस शवदाहिनी बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पिंपरी - नेहरूनगरमधील प्राण्यांच्या गॅस शवदाहिनीला लागणाऱ्या सीएनजीचे आठ महिन्यांचे एक लाख ६९ हजार ४६९ रुपयांचे बिल थकल्याने गेल्या चार दिवसांपासून गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीने महापालिकेकडे पाठपुरावा करूनही बिल मिळाल्याने गॅसपुरवठा थांबविण्याचा निर्णय कंपनीने घेतला. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यावर थकीत बिल देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेने २००७ मध्ये ही प्राण्यांची शवदाहिनी सुरू केली आहे. या थकीत बिलाच्या रकमेसाठी एमएनजीएलचे अधिकारी आठ महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होते. मात्र, आज करतो, उद्या करतो, अशी आश्‍वासने देत महापालिकेकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत नव्हती. अखेरीच चार दिवसांपूर्वी एमएनजीएलने या गॅस शवदाहिनीला होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेत त्याचा पुरवठा पूर्णपणे थांबवला. 

शवदाहिनीला आवश्‍यकतेनुसार एमएनजीएलकडून गॅसचा पुरवठा होतो. आठ महिन्यांचे बिल थकलेले असतानाही कंपनीने कधीही गॅसचा पुरवठा थांबवला नव्हता. मात्र, थकीत बिलाची रक्‍कम एक लाख ६९ हजारांपर्यंत गेल्यावर मात्र, गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. थकीत बिलाची रक्‍कम मिळेपर्यंत गॅसपुरवठा पूर्ववत केला जाणार नसल्याचे एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले. याबाबत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे म्हणाले, ‘‘काही कारणांमुळे गॅसचे बिल थकले होते, त्यांचे ९४ हजार रुपयांचे बिल दिले आहे.’’

Web Title: pimpri pune news Gas cremation off