आळंदीतील गॅसवाहिनीला ‘पिंपरी’चा खोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

रस्ता खोदाई आणि दुरुस्तीचे दर सर्वाधिक
पिंपरी - पाइपलाइनद्वारे आळंदीत गॅस पोचवण्याची योजना ‘एमएनजीएल’ने वर्षभरापूर्वी हाती घेतली होती. खोदाई आणि रस्ता दुरुस्ती संदर्भातील पत्रव्यवहार पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर केला होता. मात्र, त्या दराबाबत महापालिका ठाम असल्याने अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आळंदी गॅसवाहिनी टाकण्यास अडचण निर्माण झाली आहे. या दराबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असल्याचे ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

पाइपलाइन गॅसची सुविधा शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागात पोचवण्यासंदर्भात केंद्र सरकार आग्रही आहे. त्याचाच एक भाग म्हणून आळंदीत १२ किलोमीटर लांबीची गॅसवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, एवढी मोठी रक्‍कम परवडणारी नसल्याने हे काम करणे कठीण असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) स्पष्ट केले आहे. मातीच्या रस्त्यावर खोदाई करण्यासाठी प्रत्येक मीटरला साडेआठ हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्‍कम पिंपरी-चिंचवड महापालिका आकारत आहे. हे दर सर्वाधिक आहेत.

आळंदीत गॅसवाहिनी पोचवण्यासाठी चिखलीपासून सुरवात करावी लागणार आहे. साधारणपणे तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यासाठीच्या खोदाई आणि दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेप्रमाणे प्रत्येक मीटरला दोन हजार ७७४ रुपये दर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकारल्यास हे काम करणे शक्‍य आहे. अन्यथा आळंदीत पाइपलाइनद्वारे गॅस पोचणार नाही. देशात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करताना एक दर आणि एक यंत्रणा असावी, यासंदर्भात केंद्र सरकारकडून काम सुरू आहे. याची माहिती केंद्रीय नागरी विकास मंत्रालयानेही घेतली असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news gas pipeline issue