सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे सोने हस्तगत

रविंद्र जगधने
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पिंपरी - निगडी पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे चोरीचे सोने हस्तगत केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 16 गुन्हे उघड झाले आहेत.                                      

पिंपरी - निगडी पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे चोरीचे सोने हस्तगत केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 16 गुन्हे उघड झाले आहेत.                                      

निखिल ऊर्फ मॉन्टी दत्तात्रेय कंगणे (वय 23, रा. एकता सोसायटी, विजय म्हेत्रे बिल्डिंग, चिखली) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील संजय तापकीर यांचे कुटुंब मंगळवारी (ता. 26) रात्री साडेआठ ते साडेदहाच्या दरम्यान घराला कुलूप लावून दांडिया खेळण्यासाठी गेले होते. त्या वेळी कंगणे याने तापकीर यांच्या घराचे व कपाटाचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने व मोबाईल असा साडेबारा लाखांचा ऐवज चोरून नेला. याबाबत तापकीर यांनी पोलिसांना कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, कंगणे घटनास्थळी आल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कंगणे हा सराईत चोर असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून इतरही पंधरा गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 40 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.                                                                                            

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, अरविंद चव्हाण किसन वडेकर, खरीफ मुलानी,फारुक मुल्ला, नितीन बहिरट, मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण, स्वामीनाथन जाधव, जमीर तांबोळी, शरीफ मुलानी, मच्छिंद्र घनवट, अशोक जगताप, किशोर धनवडे, अमर कांबळे, संदिप मासाळ, जगन्नाथ शिंदे यांनी केली.

Web Title: pimpri pune news gold seized by criminal