साथीच्या रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

स्वाइन फ्लूचा कहर; महापालिकेकडून उपाययोजना सुरू
पिंपरी - शहरामध्ये साथीच्या विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या गॅस्ट्रो, कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल प्रदूषित हवेद्वारे पसरणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण आहे.

स्वाइन फ्लूचा कहर; महापालिकेकडून उपाययोजना सुरू
पिंपरी - शहरामध्ये साथीच्या विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या गॅस्ट्रो, कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल प्रदूषित हवेद्वारे पसरणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण आहे.

स्वाइन फ्लूने आतापर्यंत 27 जणांचा बळी घेतल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. तुलनेत मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अल्प आहे. साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिका वैद्यकीय विभागाकडून आवश्‍यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. संसर्गजन्य आजारांमध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आदी आजारांची लागण होते. प्रदूषित हवेद्वारे स्वाइन फ्लू आणि श्‍वसनरोग होतात. तर, डासांमुळे मलेरिया, डेंगी हे आजार बळावतात. चिकुनगुनिया या आजाराचा प्रादुर्भाव कीटकांच्या माध्यमातून होतो.

साथीच्या आजारांची सद्य:स्थिती (1 जानेवारी ते 23 जुलै) :
दूषित पाण्याद्वारे होणारे आजार लागण झालेले रुग्ण

1) गॅस्ट्रो 229
2) कावीळ 338
3) टायफॉईड 282

दूषित हवेद्वारे होणारा आजार रुग्ण मृत्यू
(1 जानेवारी ते 31 जुलै)

1) स्वाइन फ्लू 210 27

डास, कीटकांमुळे लागण झालेले रुग्ण
प्रसारित होणारे आजार

(1 जानेवारी ते 29 जुलै)
1) मलेरिया 15
2) डेंगी 11
3) चिकुनगुनिया -

महापालिकेच्या उपाययोजना :
* साथीच्या आजारांबाबत पत्रके, एसएमएस, सोशल मीडियातून जागृती
* लसीकरण सत्राच्या ठिकाणी नागरिकांसाठी जनजागृती मोहीम
* चित्रपटगृहांमध्ये स्लाइड दाखवून देणार माहिती
* महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध करणे

महापालिकेतर्फे साथीच्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. स्वाइन फ्लूसाठी एक हजार लसीची खरेदी केली आहे. त्याशिवाय, आवश्‍यक औषधे महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

Web Title: pimpri pune news Increase in dicease patients