आमदार जगताप यांनी माझ्यावर अन्याय केला - राजेंद्र जगताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आज भाजपला राम राम केला. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जगताप यांनी कायम आपल्यावर अन्याय केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनाथ जगताप यांच्या विरोधात राजेंद्र जगताप यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ‘‘गेली १५ वर्षे सार्वजनिक जीवनात आहे. पण लक्ष्मण जगताप यांनी मला कायम डावलले. २००७ मध्ये माझ्या ऐवजी त्यांचे धाकटे भाऊ शंकर यांना संधी दिली. त्यानंतर २००९ च्या विधानसभेला माझा पराभव विसरून आपला माणूस म्हणून मी त्यांना मदत केली. २०१२ मध्ये महापालिकेला मला उमेदवारी दिली. पण मी बिनविरोध होऊ नये म्हणून माझ्या विरोधात अपक्ष विलास जगताप यांना उभे केले. जनमत माझ्या मागे असल्याने साडेअकरा हजार मते घेऊन मी जिंकलो. २०१७ च्या निवडणुकीतसुद्धा माझा घात केला. शेवटच्या दोन दिवसांत तीन कमळ, एक शिट्टी असा प्रचार करून त्यांनी मला पाडले. अशा राजकारणामुळे नाराजीमधूनच भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.’

Web Title: pimpri pune news MLA Jagtap did injustice to me