नववर्षाच्या स्वागताला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पिंपरी - अवकाळी पावसाने शहर परिसरात रविवारी जोरदार हजेरी लावत हिंदू नववर्षाचे स्वागत केले. 

दुपारपासूनच शहरातील वातावरण ढगाळ झाले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली आणि साडेपाचनंतर त्याचा जोर वाढत गेला. अचानक आलेल्या पावसामुळे संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या गुढीपाडव्याच्या मिरवणुका संयोजकांना रद्‌द कराव्या लागल्या.

पिंपरी, निगडी, आकुर्डी या परिसरात पावसाचा जोर चांगला होता. त्यामुळे सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तासाभरापासून बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठले होते. अनेक भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठादेखील खंडित केला, त्यामुळे उकाड्यात भर पडली. 

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वातावरण ढगाळ झाले होते. त्यामुळे पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली. शहरात तासाभराहून अधिक काळ कोसळणाऱ्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

भोसरीत रस्त्यांवर साचले पाणी
भोसरी - अवकाळी पावसामुळे भोसरीतील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. सायंकाळी सहानंतर अर्धा तास पाऊस झाला. बन्सल सिटी रस्ता, सीएमई भिंतीजवळ, गावठाणातील मारुती मंदिर, लांडेवाडीतील साईधाम रुग्णालयासमोरील रस्ता, अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील महामार्गाचा सेवा रस्ता, चक्रपाणी वसाहत रस्ता तसेच, गतिरोधकांजवळ व खोलगट भागांमध्येही पाणी साचले होते.

नवी, जुनी सांगवीतही हजेरी 
जुनी सांगवी आणि नवी सांगवी परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार  हजेरी लावली. यामुळे गुढीपाडवा नववर्षानिमित्त नियोजित कार्यक्रम तासभर खोळंबले. सुटीचा दिवस, हिंदू नववर्ष यानिमित्ताने अनेकांचे सायंकाळी घराबाहेर पडण्याचे नियोजनही पावसामुळे हुकले. तासभर कमी अधिक वाऱ्यासह आलेल्या पावसाने रस्त्यांवरून पाणी वाहत होते. यामुळे अंदाज नसलेला पाऊस अचानक आल्याने नागरिकांची त्रेधा उडाली.

Web Title: pimpri pune news new year welcome rain