निगडी-दापोडी बीआरटीला प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पिंपरी - पिंपरी चिंचवडकरांना निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग सुरू होण्यासाठी आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. या मार्गावरील अनेक कामे अजूनही अपूर्ण असल्यामुळे ही ‘डेडलाइन’ महिन्याभराने वाढली आहे. 

निगडी ते दापोडी बीआरटी मार्ग सप्टेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या होत्या. मात्र, तरीही सेवा सुरू होऊ शकली नाही. आता ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर ही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. 

सध्या या मार्गावर नवीन बसस्थानके उभारणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, आदी कामे सुरू आहेत. मात्र, हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे बससेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या साडेबारा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटी सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. याबाबत हर्डीकर म्हणाले, ‘‘निगडी ते दापोडी या बीआरटी मार्गावर १४ ठिकाणी बसथांबे उभारण्याचे काम सुरू आहे. नऊ बसथांबे तयार आहेत. वाहनतळाची सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात असून त्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

बस थांबे, सेफ्टी ऑडिट, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.’’

या मार्गावर पीएमपीच्या वाढीव बस आणण्याचे नियोजन सुरू आहे. या सगळ्या कामाचा आढावा घेत आहोत. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल. त्यानंतर बीआरटीचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. यानंतर न्यायालयाची बंदी उठविण्याबाबत प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिलीप बंड आयुक्त असताना २००६ मध्ये बीआरटी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. त्यानंतर जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरात बीआरटी प्रकल्प राबविण्यास सुरवात झाली. परंतु, अजूनही अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत.

Web Title: pimpri pune news nigdi-dapodi brt route