पिंपरी शहरात आता पोर्टेबल टॉयलेट

पिंपरी शहरात आता पोर्टेबल टॉयलेट

पिंपरी - देशपातळीवर स्वच्छ शहर स्पर्धेत घसरलेला दर्जा सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ऑटोमॅटिक टॉयलेट’नंतर पोर्टेबल टॉयलेटची मदत घेण्यात आली आहे. २२ लाख लोकसंख्येच्या शहरात अद्यापही उघड्यावर शौच केली जात असल्याने ‘ओडीएफ’च्या मार्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी झोपडपट्ट्यांत ही पोर्टेबल टॉयलेट बसविण्यात आली आहेत.

त्यामुळे लहान मुलांची विशेष सोय झाली आहे. दोन महिन्यांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी बसविण्यात आलेल्या या टॉयलेटचा रिझल्ट चांगला आल्याने आता ती पुन्हा बसविण्यात येणार आहेत. 

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिकच नव्हे; तर वैयक्तिक स्वच्छतागृह तथा टॉयलेटची कमतरता आहे. हीच बाब स्वच्छ शहर हागणदारीमुक्त होण्यात अडथळा ठरली. त्यामुळे दोन ऑक्‍टोबरपर्यंत शहर ‘ओडीएफ’ झाले नाही. शहर स्मार्ट होण्यात कचऱ्याच्या जोडीने हाच मुख्य अडथळा प्रशासनाला जाणवत आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील झोपडपट्टी असलेल्या भागात त्यातही वैयक्तिक आणि सार्वजनिक टॉयलेट नसलेल्या ठिकाणी ही अडीचशे पोर्टेबल टॉयलेट दोन महिन्यांसाठी बसविण्यात आली होती. त्यांची मुदत संपली आहे. मात्र, त्याचा रिझल्ट चांगला आल्याने पुन्हा हा उपक्रम सुरू ठेवण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. त्यानुसार अशा पन्नास टॉयलेटचे काम बीएसएम एंटरप्रायजेस या संस्थेला देण्यात आले आहेत. त्या जोडीला शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कमतरतेवर उतारा म्हणून सुलभ शौचालयाच्या धर्तीवरील ‘ई’ तथा ऑटोमॅटिक टॉयलेटचे कामही एका खासगी संस्थेला पालिकेने सप्टेंबर महिन्यात दिले आहे. प्रत्येक किलोमीटरवर शहरात ती उभारण्याचा मानस आहे; तसेच वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीलाही पालिका प्रशासनाने वेग दिला आहे.

अजंठानगर, इंदिरानगर, आनंदनगर, भाटनगर, रमाबाईनगर आदी झोपडपट्ट्यांत पोर्टेबल टॉयलेट देण्यात आली आहेत. शहरातील सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत उघड्यावर शौच होणाऱ्या भागात ती बसविण्यात आली आहेत. 
- दिलीप गावडे, सहआयुक्त, पिंपरी महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com