‘बीआरटीएस’वरील सुरक्षेबाबत जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी महापालिकेतर्फे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे. संबंधित रस्त्यालगत येणाऱ्या कंपन्या, शाळा आणि सार्वजनिक संस्था यांच्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. 

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी महापालिकेतर्फे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे. संबंधित रस्त्यालगत येणाऱ्या कंपन्या, शाळा आणि सार्वजनिक संस्था यांच्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. 

औंध-रावेत रस्ता आणि नाशिकफाटा-वाकड रस्ता येथे २०१५ मध्ये बीआरटीएस सेवा सुरू करण्यात आली. या सेवेबाबत नागरिकांना संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. त्या वेळी या सेवेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले होते. त्यामुळे या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्‍वभूमीवर, निगडी ते दापोडी आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. याबाबत विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण करावी, असे जागतिक बॅंकेने सुचविले आहे.

त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारच्या शहरी निर्माण विभागामार्फत जागतिक बॅंकेकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला ३१ ऑक्‍टोंबर २०१७ ला ई-मेलद्वारे जागतिक बॅंकेने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या शहरी निर्माण विभागाने ही माहिती महापालिकेला कळविली आहे. जागतिक बॅंकेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार या प्रकारच्या कामाचा अनुभव असलेली सेंट्रल फॉर एनव्हर्मेंटल एज्युकेशन (सीईई) या संस्थेच्या मागील कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांना हे काम दिले जाणार आहे.

त्यासाठी ५४ लाख ७५ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. संबंधित खर्च जागतिक बॅंकेच्या मंजूर जागतिक पर्यावरण निधीमधून (जीईएफ) केला जाईल. या कामामध्ये जागतिक बॅंकेचा ८९ टक्के हिस्सा असेल. तर, ११ टक्के हिस्सा महापालिकेचा असणार आहे. दरम्यान, या खर्चाला नुकतीच स्थायी समिती सभेने मंजुरी दिली.

शहरातील दोन प्रमुख बीआरटीएस मार्ग सुरू करण्यापूर्वी नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत जागरूकता करण्यावर भर असेल. महापालिका संकेतस्थळ, होर्डिंग्ज, पत्रके आदींच्या माध्यमातून याबाबत जागरूकता केली जाईल. त्याशिवाय, संबंधित मार्गाच्या जवळ असणाऱ्या कंपन्या, शाळा, सार्वजनिक संस्था आदी ठिकाणी जाऊनदेखील जनजागृती केली जाईल. 
- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस विभाग

Web Title: pimpri pune news publicity for brts security