रिक्षातून प्रवास नव्हे, शिक्षा

संदीप घिसे
सोमवार, 19 मार्च 2018

पिंपरी - भंगारातील रिक्षांमधून प्रवासी वाहतूक, मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणे, परवाना-बॅच आणि कागदपत्रे न बाळगणे, गणवेश न घालणे, क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी बसविणे आदी कारणांमुळे शहरातील रिक्षा सेवा प्रवाशांना शिक्षा ठरत आहे. 

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव रिक्षातून प्रवास करावा लागतो. त्यातच अधिक नफा कमविण्यासाठी रिक्षातून क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवाशांची वाहतूक केली जाते. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याकडे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होत आहेत.

अनेक रिक्षाचालक अल्पवयीन व गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. अनेकांकडे परवाना, बॅच, गणवेश, कागदपत्रे नसतात. प्रवाशांशी उद्धट बोलणे, महिलांबाबत अश्‍लील शेरेबाजी, आपापसांत हाणामारी, रिक्षा रस्त्यातच उभ्या केल्याने वाहतूक कोंडीत भर, वाहतूक पोलिसांचा धाक नाही.

प्रवासी क्षमता ३
प्रत्यक्ष प्रवासी ६ ते ८
प्रवाशांच्या आसनावर ४
चालकाच्या शेजारी ३ ते ४ 

वस्तुस्थिती
 निगडी-तळवडे, निगडी-भोसरी, डांगे चौक-सांगवी, भोसरी-चाकण या मार्गांवर सहाआसनी रिक्षांतून वाहतूक
 शहराच्या विविध भागांत भंगार रिक्षांतून प्रवासी वाहतूक सुरू असून प्रवाशांच्या जिवाला धोका
 मीटरप्रमाणे भाडे आकारणीचे रिक्षा संघटनांचे केवळ आश्‍वासन

दृष्टिक्षेपात रिक्षा
 परवानाधारक - ८ हजार
 विनापरवाना - २ हजार
 भंगारातील - ५००
 शेअर रिक्षा मार्ग - १६
 शेअर रिक्षा स्वयंघोषित मार्ग - ४२

सहाआसनी रिक्षा आणि भंगारातील रिक्षांबाबत आरटीओ व वाहतूक पोलिस काहीच कारवाई करीत नाहीत.
- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईसाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांची संयुक्‍त कारवाई घेतली जाईल.
- राजेंद्र भामरे, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: pimpri pune news rickshaw journey