मनमानी केल्यामुळे परवाना रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पिंपरी - एक प्रवासी रिक्षात बसतो. इच्छित स्थळ सांगतो. मात्र, प्रवासी मीटर सुरू करायला लावतो. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतो. ‘दंड भर आणि तुझा परवाना रद्द झाला आहे’, असे जेव्हा तो प्रवाशाच्या वेशातील पोलिस सांगतो, तेव्हा रिक्षाचालकाची भंबेरी उडते. 

रिक्षाचालकांच्या अरेरावीला आणि बेशिस्तीला चाप लावण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांकडून नुकतीच कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत एक हवालदार आणि दोन महिला पोलिस कर्मचारी असलेले पथकही स्थापन केले आहे. साध्या वेशातील हे पथक प्रवासी म्हणून रिक्षातून प्रवास करीत असून, त्यामध्ये दोषी आढळून येणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात आहे. 

गेल्या दोन दिवसांत अशा ३६ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातील पाच चालकांवर वाहन परवाना निलंबनाची कारवाई केली गेली आहे. सध्या ही मोहीम सांगवी फाटा व औंध रस्त्यावर राबविली जात असली तरी नजीकच्या काळात काळेवाडी परिसरात ही राबविण्याचे उद्दिष्ट आहे. पोलिस उपायुक्त अशोक मोराळे आणि सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे. 

‘आरटीओ’चीही घेणार मदत
सध्या केवळ वाहतूक विभागस्तरावर ही कारवाई केली जात आहे. 
पुढील टप्प्यात प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ही मोहीम राबविण्याच्या विचाराधीन आहे. वाहतूक पोलिसांपेक्षाही आरटीओला अधिक अधिकार आहेत. या अधिकारांतर्गत कारवाई झाल्यास रिक्षाचालकांमध्ये चांगला संदेश पोचेल,’’ असे सांगवी वाहतूक विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवासासंदर्भात येणाऱ्या तक्रारींत वाढ झाली आहे. रिक्षाचालकांच्या मनमानीला आणि बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठीच ही मोहीम राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. अवघ्या दोन दिवसांमध्ये ३६ रिक्षाचालक दोषी आढळून आले. त्यांच्यावर विविध कलमान्वये ५० पासून एक हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली गेली. वाहनाची कागदपत्रे नसलेली एक रिक्षा थेट भंगारामध्ये पाठविण्याचा अहवालही पाठविण्यात आला.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी

चुकीच्या वर्तनाचे पंचायतीने कधीही समर्थन केलेले नाही. जवळचे भाडे आकारणे अथवा मीटरचा वापर न करणाऱ्यांवर जरूर कायद्याचा बडगा उगारावा. मात्र, संबंधित चालक कोणत्या परिस्थितीत भाडे नाकारत आहे, याची पडताळणी करणे आवश्‍यक आहे. चहा, नाश्‍ता आणि जेवणासाठी भाडे आकारण्याचा अधिकारी चालकांना देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ नये, याची काळजी घेतली जावी.
- बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी रिक्षा पंचायत

मोहिमेंतर्गत झालेली कारवाई
    गणवेश नसणे
    जवळचे भाडे नाकारणे
    वाहन कागदपत्रे नसणे
     मीटर पद्धतीने भाडे आकारण्यास टाळाटाळ
     विनावाहन परवाना

Web Title: pimpri pune news rickshaw permit cancel