वर्धापन दिन उत्साहात...

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड - ‘सकाळ’ पिंपरी कार्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना शुभेच्छा देताना ‘यिन’चे विद्यार्थी.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड - ‘सकाळ’ पिंपरी कार्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना शुभेच्छा देताना ‘यिन’चे विद्यार्थी.

पिंपरी - सनई- चौघड्याचा मंगलमय सूर..आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई.. रांगोळ्या.. अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी (ता. २८) ‘सकाळ’च्या पिंपरी- चिंचवड विभागीय कार्यालयाचा २५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित स्नेहमेळाव्यास आवर्जून उपस्थिती लावत वाचकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘सकाळ’ला शुभेच्छा दिल्या. 

महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. प्रवीण आष्टीकर, पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, सार्वजनिक आहार व पोषण तज्ज्ञ डॉ. राम गुडगिला, योग अभ्यासक दिनेश तळेकर आदींचा त्यात समावेश होता. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सकाळ’ समूहातर्फे गेला आठवडाभर आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे या वेळी सर्वांनी भरभरून कौतुक केले. त्या वेळी वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील पुरवण्यांचाही आवर्जून उल्लेख केला.  सहायक व्यवस्थापक सुनील फलफले, वरिष्ठ प्रतिनिधी परशुराम सैद, पिंपरी विभागाचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ,  जाहिरात विभागाचे व्यवस्थापक अमोल गुळुंबे, उपव्यवस्थापक प्रेम मोटे, सहायक व्यवस्थापक अभिजित मारणे, राजेश खरे, ज्येष्ठ वार्ताहर मिलिंद वैद्य, ज्ञानेश्‍वर बिजले, सुधीर साबळे, वैशाली भुते, सागर शिंगटे, संदीप घिसे, दीपेश सुराणा, आशा साळवी, रवींद्र जगधने, अरुण गायकवाड, संतोष हांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छांचा स्वीकार केला.  

उपस्थित जाहिरात एजन्सी चालक
राहुल देशपांडे, विलास गंधे, तुषार गंधे, वृंदा गंधे, लतीश बलकवडे, दिनेश लिंगवत, अजय सपकाळ, विक्रम शिंदे, विजय शिंदे, वैभव साळुंखे, राजकुमार कांबीकर, संजय वीर, देवदत्त जोशी, माणिक डगरे, भाऊसाहेब बलकवडे, ओमप्रकाश ढवळे, प्रदीप शिंदे, अशफाक शेख, गणेश कदम, शशिकांत पांडे.

जाहिरातदार
अभिजित बाफना, दिलीप सोनिगरा, बाळासाहेब थोपटे, डॉ. अमित वाघ, योगेश दातार, नंदकुमार लांडे, अमित फटांगरे, राहुल शेंडगे, श्रेयस पगारिया, अशोक पगारिया, लक्ष्मण टक्केकर, नितीन टक्केकर, धीरज टक्केकर, विलास वाडीकर, रवींद्र नामदे, नारायण बहिरवाडे, संतोष बारणे, परमानंद जमतानी, डॉ. संदीप पाचपांडे, डॉ. आशा पाचपांडे, सतीश अनारसे, संजय इनामदार, नरेश चढ्ढा, बाळासाहेब गावडे, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. अरविंद खरात, भूषण नातचे, विजय नवले, प्रा. आर. जी. बिराजदार यांनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

प्रेक्षागृह फुलले...
सायंकाळी सहापासून हा स्नेहमेळा सुरू झाला. हळूहळू विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शेकडो वाचकांच्या उपस्थितीने बघता बघता प्रेक्षागृहाचे प्रांगण गर्दीने फुलून गेले आणि उत्तरोत्तर गप्पा, चर्चा, अभीष्टचिंतनाने कार्यक्रम रंगत गेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com