सांगली पोलिसांचा चिंचवडमधील वधु-वर सुचक केंद्रावर छापा

रवींद्र जगधने
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पिंपरी - सांगली जिल्ह्यात अनेकांना वधु-वर सुचकाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या राजकिशोर वधु-वर सूचक केंद्रांच्या चिंचवडगावातील शाखेवर सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. मात्र, केंद्राचा चालक सापडला नाही. पोलिसांनी अनेक कागदपत्रे हस्तगत केली आहेत.  

पिंपरी - सांगली जिल्ह्यात अनेकांना वधु-वर सुचकाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या राजकिशोर वधु-वर सूचक केंद्रांच्या चिंचवडगावातील शाखेवर सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. मात्र, केंद्राचा चालक सापडला नाही. पोलिसांनी अनेक कागदपत्रे हस्तगत केली आहेत.  

विविध वयोगटातील विवाहास इच्छुक असणाऱ्यांना वधू किंवा वर दाखऊन हजारो रूपयो उकळून पसार झालेला केंद्राचा प्रमुख राजकिशोर शिंदे, पत्नी विजया शिंदे यांच्याविरोधात सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिस त्यांना पकडण्यात दिरंगाई करीत असल्याने फसगत झालेल्या लोकांनी शनिवारी या केंद्रावर हल्लाबोल केला. केंद्राचे कुलूप तोडून प्रवेश केला होता. त्यामुळे सांगली पोलिसांनी केंद्राचा शोध घेतला असता ते चिंचवडगाव येथील मधुबन सोसायटी बी-४०३ या सदनिकेत नुकतेच सुरू झाल्याची माहिती समजली. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार दु-यापा खोत, पोलीस नाईक अतुल माने, पोलिस शिपाई किरण कांबळे, सचिन पवार,  महिला पोलिस शिपाई प्रियंका चव्हाण यांच्या पथकाचे केंद्रावर छापा टाकला. मात्र, केंद्रचालक राजकिशोर मिळाला नाही.  पोलिसांनी महत्त्वाचे कागदपत्रे हस्तगत केली आहेत.  त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गोरडे व कांचन दोडे उपस्थित होते.  

वाकड पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राच्या विरोधात साधारण सहा महिन्यापूर्वी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सोळा नंबर या ठिकाणी असलेले केंद्र चिंचवड येथे स्थलांतरित केले होते. मात्र, सदनिका मालकाकडे केंद्रचालकाचे कोणतेच कागदपत्रे नसून त्याने सदनिका ऑनलाइन भाड्याने घेतली आहे.  अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

Web Title: pimpri pune news Sangli police raid on Bride-groom center at Chinchwad