लखलाभ ‘सारथी’

दीपेश सुराणा
गुरुवार, 13 जुलै 2017

संकेतस्थळ, हेल्पलाइन, मोबाईल ॲप आदी माध्यमांचा वापर

चार वर्षांमध्ये साडेआठ लाख नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी - महापालिकेने चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘सारथी’ प्रकल्पाचा ८ लाख ४५ हजार ६६१ नागरिकांनी लाभ घेतला आहे. संकेतस्थळ, हेल्पलाइन, मोबाईल ॲप, ई-पुस्तक, पीडीएफ पुस्तक, लिखित पुस्तक अशा माध्यमातून नागरिकांनी सारथी प्रणालीची माहिती जाणून घेतली. तसेच, त्यांना जाणवणाऱ्या विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग केला.

तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी १५ ऑगस्ट २०१३ ला ‘सारथी’ प्रकल्प कार्यान्वित केला. महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती नागरिकांना सोप्या शब्दात, प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हा ‘सारथी’ प्रकल्पाचा उद्देश होता. महानगरपालिकेचे विविध विभाग आणि शासनातर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, आवश्‍यक शुल्क, सेवा पुरविण्यासाठीचा कालावधी व त्याची कार्यपद्धती यांची माहिती ‘सारथी’मध्ये एकत्रित देण्यात आली.

नागरिकांना मोबाईल ॲप, ई-बुक, पीडीएफ बुक आदी माध्यमांद्वारे ही माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.

Web Title: pimpri pune news sarthi project