निखळ आनंदात न्हाले प्रांगण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

पिंपरी - एरवी रुक्ष..रखरखीत..कडवी शिस्त आणि अभ्यासाच्या तणावाखाली असणारे शाळांचे प्रांगण आज निखळ आनंदात न्हाऊन निघाले होते. नव्याकोऱ्या वह्यापुस्तकांच्या सुंगधांसह हारफुलांच्या सुगंधातही हे प्रांगण हरपले होते. शाळेची घंटा तर वाजलीच; पण त्याला ढोल-ताशांचा गजर आणि सुरमयी संगीताची जोड मिळाली. सुरेख स्वागत फलक, रांगोळी, पताका, फुगे, मस्कॉट, खाऊ अशा गोष्टींनी बालचमू हरखून गेले.

निमित्त होते शाळेच्या पहिल्या दिवसाचे. विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीचा बागुलबुवा दूर व्हावे व त्यांना शाळेची गोडी लागावी या हेतूने शहरातील महापालिका तसेच खासगी शाळांनी ‘प्रवेशोत्सव’ साजरा केला.

रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिरात नगरसेविका संगीता ताम्हाणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प तसेच पाठ्यपुस्तके देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका एच. डी. वाघ, अध्यक्ष आनंद गौंड उपस्थित होते. ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालयामध्ये ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. रांगोळी, पताका आणि फुग्यांनी शाळेची सजावट केली होती. विद्यार्थ्यांना खाऊ व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नगरसेविका संगीता ताम्हाणे, विठ्ठल गवळी, सुमन गवळी, मुख्याध्यापक प्रज्ञा सोनवणे, राहुल गवळी उपस्थित होते. 

दिघीतील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी नवगतांचे स्वागत केले. नगरसेवक विकास डोळस, निर्मला गायकवाड यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, गुलाबपुष्प, खाऊ आणि फुगे वाटण्यात आले. ‘सारे शिकू या, पुढे जाऊ या’, ‘एक दोन तीन चार, चला चला शाळेला चला’, अशा घोषणांनी महापालिकेच्या निगडीतील कन्या शाळेचा परिसर दणाणून गेला.

प्रभातफेरीतून पालकांमध्ये उत्साह जागविला. सुमन पवळे, कमल घोलप, उत्तम केंदळे यांच्या हस्ते नवगतांचे स्वागत करण्यात आले. कल्पना तळेकर यांनी विद्यार्थिनींना पुस्तकाविषयी प्रतिज्ञा दिली. कल्पना तळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष बेंद्रे यांनी आभार मानले. सुशीला ठोंबरे, रेश्‍मा वाळेकर, विजया टिळेकर, कल्पना राऊत, संतोष बेंद्रे, सुनीता माने यांनी संयोजन केले. 

मोशीतील यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे धूमधडाक्‍यात स्वागत करण्यात आले. संस्थापक सुभाष देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. शिक्षणाबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. ‘गिरवू अक्षर, होऊ साक्षर’, ‘अ ब क ड शिकूया, देश साक्षर बनवू या’ आदी घोषणा देण्यात आल्या.

Web Title: pimpri pune news school start in pimpri