विद्यार्थी, पालकांसाठी चिंचवडमध्ये मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’तर्फे सातवी ते नववीत शिकणाऱ्या, तसेच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ५.३० वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे हे चर्चासत्र होणार आहे. हे चर्चासत्र विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य आहे.

दहावीचा अभ्यास व गुण मुलांच्या भावी करिअरची दिशा ठरवत असतात. पुढील वर्षापासून बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न व अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहे. याविषयी पालक व मुलांमध्ये संभ्रम आहे. या विशेष चर्चासत्रात पुढील
वर्षीचा (२०१९-२०) दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न, बदललेला अभ्यासक्रम, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी सखोल माहिती पालक व विद्यार्थ्यांना मिळेल. दहावीनंतर कला, शास्त्र, वाणिज्य शाखांची निवड, अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या आयआयटी-जेईई, नीट, सीईटी अशा प्रवेश परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम व बदललेले स्वरूप, सातवीपासूनच या परीक्षांची तयारी, दहावीनंतर उपलब्ध असणारे करिअरचे पर्याय, संधी, नेमक्‍या पर्यायाची निवड, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरची विविध क्षेत्रे व नामांकित संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रियांविषयी प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करणार आहेत.

चर्चासत्राबाबत... 
 कधी - गुरुवार, २९ मार्च 
 केव्हा - सायंकाळी ५.३० वाजता 
 कोठे - प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड 
 अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९५४५९५४७३३ 
 विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य

Web Title: pimpri pune news student parent guidance education