आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

उन्हामुळे डोळ्यांच्या तक्रारींमध्येही वाढ होते. डोळ्यांच्या तक्रारींना दूर ठेवण्यासाठी उन्हात फिरताना डोळ्यांना सांभाळावे.
- डॉ. प्रियांका मुरगुडे, नेत्रतज्ज्ञ

पिंपरी - मार्चअखेरीलाच उन्हाचा पारा चढल्याने वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्मा निर्माण झाला आहे. या उष्णतेमुळे आरोग्यावर येणारा ताण टाळण्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही सहजसोप्या उपाययोजना केल्याने आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी या उपाययोजना समजून घ्याव्यात, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल
    भर उन्हात उघड्या डोळ्यांनी जाऊ नका. 
    एसीतून उठून कडक उन्हात फिरू नका. 
    डोळ्यांत जळजळ, लालसरपणा आल्यास घरच्या घरी उपचाराचा मोह टाळा. 

काय करावे...
    तहान लागली नसतानाही सतत पाणी पीत राहावे
    हलक्‍या रंगाचे व पातळ सुती कपडे घालावेत.
    उन्हात जाताना टोपी, छत्रीचा वापर करावा.
    उन्हात ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा.
    शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी लस्सी, ताक, सरबताचा नियमित वापर करावा. 
    अशक्तपणा, सूस्तपणा, चक्कर येणे व डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
    उन्हात काम करताना अधेमधे विश्रांती घ्यावी.
    गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

हे करा
    उन्हात फिरताना शक्‍यतो ब्रॅंडेड कंपनीचा गॉगल वापरा.
    दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा, डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवा. 
    आहारात जीवनसत्त्व अ असलेले पदार्थ असू द्या. 
    शक्‍य असल्यास डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवा. 
    रबरी सोलच्या चपला, बूट वापरा.

काय करू नये?
 लहान मुले तसेच प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
    दुपारी १२ ते तीन या कालावधीत उन्हात जाणे टाळावे.
    गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.
    तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
    उन्हाच्या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे अथवा स्वयंपाक घराची दारे- खिडक्‍या उघड्या ठेवून कामे करावीत.
    पाण्याचे प्रमाण कमी करणारे चहा, कॉफी, मद्य, कार्बोनेटेड शीतपेयांचा वापर टाळावा.
    शिळे व उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

Web Title: pimpri pune news summer health care