तनिष्का आरुडे खून खटला जलदगती न्यायालयात चालवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पिंपरी - चऱ्होलीतील तनिष्का आरुडे (वय ४) खून खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्ट) चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी तनिष्काची आई योगिता आणि वडील अमोल आरुडे यांनी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे केली.

खाऊचे आमिष दाखवून पाच लाखांच्या खंडणीसाठी तनिष्का आरुडेचे २८ जूनला अपहरण करून खून केला. या प्रकरणी शुभम विनायक जामनिक, प्रतीक उर्फ गोलू अरुण साठले (दोघे रा. चऱ्होली, मूळगाव मूर्तिजापूर, जि. अकोला) यांना अटक केली असून, ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तनिष्का बेपत्ता झाल्यापासून दोघेही बाहेरगावी गेले होते. 

दरम्यान, तनिष्काचे आई-वडीलांनी पोलिस आयुक्त शुक्‍ला यांची भेट घेऊन तनिष्काच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, याकरिता पोलिसांनी सबळ पुरावे जमा करावेत, अशी मागणी केली. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ॲड. उज्ज्वला पवार, ॲड. अरुण ढमो आणि ॲड. मकरंद औरंगाबादकर यांची नियुक्‍ती करावी. 

Web Title: pimpri pune news tanisshka aarude murder case in speed court