पिंपरीतील वाहन परवाने मार्केट यार्डच्या ओढ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

बिबवेवाडी - मार्केट यार्ड येथील ओढ्यात तब्बल सहा पोती वाहन चालविण्याचे परवाने, वाहन नोंदणी परवाने, लर्निंग लायसेन्स आढळून आले आहेत. ही सर्व कागदपत्रे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आहेत. 

बिबवेवाडी - मार्केट यार्ड येथील ओढ्यात तब्बल सहा पोती वाहन चालविण्याचे परवाने, वाहन नोंदणी परवाने, लर्निंग लायसेन्स आढळून आले आहेत. ही सर्व कागदपत्रे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आहेत. 

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खैरे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे पथकासह मार्केट यार्डातील ओढ्यांची साफसफाईच्या कामाची पाहणी करीत होते. त्या वेळी पणन महामंडळाच्या शेजारील ओढ्याच्या पात्रात वाहन परवाने, वाहनांचे नोंदणी परवाने, लर्निंग लायसेन्सनची स्मार्ट कार्डे असलेली सहा पोती ओढ्यात टाकलेली दिसून आली. ही कागदपत्रे येथे कोणी व का टाकली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. संबंधितांना याबाबत कळविण्यात येणार असल्याचे अविनाश सकपाळ यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news vehicle license in market yard rivulet