दसऱ्यासाठी वाहन खरेदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पिंपरी - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा शनिवारी (ता. ३०) साजरा होत आहे. या सणासाठी ग्राहक नवीन वस्तूंची खरेदी करतात. त्यासाठी सोने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू आणि वाहनांची दुकाने सजली आहेत. विजयादशमीला गुंजभर सोने खरेदी करावे, अशी परंपरा आहे. दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी आहे. पितृपक्षात थंडावलेल्या बाजारातील आर्थिक उलाढाल वाढली आहे. सोने - चांदी बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सवलतींच्या योजना जाहीर केल्या आहेत, असे नीलेश कटारिया यांनी सांगितले. 

ग्राहकांना भेटवस्तू
दस-याच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. सोने प्रति तोळा ३० हजार तर चांदी ४० हजार रुपये किलो आहे, असे दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचे  संचालक दिलीप सोनिगरा व सत्यम ज्वेलर्सचे संचालक राहुल चोपडा यांनी सांगितले. तरी, या दिवशी विशेष करून लक्ष्मीची मूर्ती, नाणे, पुजेच्या वस्तू असो किंवा एखादा दागिना तरी खरेदी केला आहे. सोनिगरा ज्वेलर्सकडून पाच हजारांपुढील खरेदीवर सर्व ग्राहकांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. 

इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठ
एलईडी, एलसीडी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रो ओव्हन, लॅपटॉप या इलेक्‍ट्रॉनिकचे शॉपमध्ये खरेदीवर ऑफर्स देऊ केल्या आहेत, असे श्री राजेंद्र डिपार्टमेंटल स्टोअर्सचे राजेश कावेडिया यांनी सांगितले.

वाहनांची आगाऊ नोंदणी
नवरात्रोत्सवात १२५ दुचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी केली आहे, कागदपत्रांची पूर्तता करून ही वाहने दसऱ्याला घरी नेली जातील. असे हिरा सुझूकीचे अधिकृत विक्रेते मॅनेजर आनंद शिंदे यांनी सांगितले. दुचाकीप्रमाणे चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी मोठ्या संख्येने झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले.

दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर वाढले आहेत. त्याचा राष्ट्रीय बाजारातही परिणाम जाणवला. दिवाळीपर्यंत दर वाढत जाण्याची शक्‍यता आहे. यंदा आम्ही जेवढे सोने खरेदी कराल, तेवढ्याच वजनाची चांदी फ्री’ ही योजना ग्राहकांना देऊ केली आहे. 
- राहुल चोपडा, संचालक, सत्यम ज्वेलर्स

Web Title: pimpri pune news vehicle purchasing for dasara