पिंपरी आरटीओचा कारभार अंधारात

PCMC-RTO
PCMC-RTO

पिंपरी - दहा महिन्यांचे वीजबिल थकविल्यामुळे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरणने तोडला आहे. परिणामी गेली चार-पाच दिवस आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. 

आरटीओ कार्यालयाने मार्च ते डिसेंबर २०१८ या दहा महिन्यांचे सुमारे एक लाख ७५ हजार रुपयांचे वीजबिल भरलेले नाही. त्यासंदर्भात महावितरणने वारंवार कार्यालयाला स्मरणपत्र पाठविले. तरीही वीजबिल भरले गेले नाही. अशा थकबाकीदारांविरोधात महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत अखेर आरटीओ कार्यालयाचा विद्युतपुरवठा खंडित केला. त्यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून या कार्यालयाचा कारभार अंधारात सुरू आहे. नागरिकांना त्या विषयी माहीत नसल्यामुळे त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शिकाऊ परवान्यासाठी येणारे परीक्षार्थीही वैतागले आहेत. तशी भावना ते व्यक्त करीत आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध झाले नाहीत.

थकबाकीदारांविरोधात महावितरण विभागाने वसुली मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्षाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. त्या मोहिमेअंतर्गत आरटीओ कार्यालयाचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.
- राहुल गवारे, अभियंता, महावितरण भोसरी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com