मोबाईलवर बोलणाऱ्या 15 वाहनचालकांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पिंपरी - मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या 15 जणांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांचे परवाने जप्त करून पुढील कारवाईसाठी वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत. 

पिंपरी - मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या 15 जणांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांचे परवाने जप्त करून पुढील कारवाईसाठी वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत. 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका, अशा सूचना अनेकदा वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. त्याबाबत जनजागृतीही केली जाते. मात्र वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरात सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. वाहतूक व शहर पोलिसांसह काही स्वयंसेवी संस्था, कंपन्यांतर्फे वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. तरीही मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे सर्रास दिसून येत आहेत. अशा वाहनचालकांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. काही वाहनचालकांना समज दिली. सुमारे 15 जणांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला. प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. 

अशी होते कारवाई 
मोबाईलवर बोलत वाहन चालविल्यास किमान 200 रुपये दंड तत्काळ आकारला जातो. अशा वाहनचालकांचा परवाना जप्त करून तो वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यांच्याकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) माहिती दिली जाते. आरटीओकडून वाहनचालक परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही केली जाते, असे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी सांगितले. 

Web Title: Pimpri Transport Police took action against 15 people mobile talking