पिंपरी : तरुणाची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

निनादचे एमपीएससी व युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न होते. तो एमपीएससीची पूर्व परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

पिंपरी - रहाटणीतील वर्धमान हाईट्स इमारतीच्या आठव्या मजल्यावरून एका आयटीयन्स तरूणाने उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी सुमारास घडली. 

निनाद दिसभुषण पाटील (वय 24, रा. ई-406, वर्धमान हाईट्स, रहाटणी, मुळ रा. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद हा अविवाहित असून तो आई वडीलांबरोबर रहात होता. तो उच्च शिक्षित असून काही महिन्यांपूर्वी इन्फोसिस या आयटी कंपनीत नोकरी करत होता. मात्र त्याचे गेले आठ महिन्यांपासून मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतू शनिवारी त्याने अचानक आठव्या मजल्यावरून उडी मारली. 

निनादचे एमपीएससी व युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न होते. तो एमपीएससीची पूर्व परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

Web Title: Pimpri: The youth jumped on the eighth floor and committed suicide