पिंपरीचिंचवड रस्ता गेला अतिक्रमणे आणि खड्ड्यात

विलास काटे
मंगळवार, 3 जुलै 2018

मिस्डकॉल दिला तरी पुन्हा फोन करा असा आदेश देणारे प्रांताधिकारी आयुष प्रसाद स्वतः मात्र फोनवर प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.

पुणे - अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारच असतो. पालिकेचा पाणीपुरवठा आणि विद्युत विभाग एकटे दत्तात्रय सोनटक्केच सांभाळत आहे. पिंपरीचिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्यासाठी जादाचे कर्मचारी अद्याप उपलब्ध झाले नाहीत. शहरात बहुतांश ठिकाणची अतिक्रमणे आहे तशीच आहेत. तर प्रदक्षिणा रस्त्यावर अद्याप खड्डे आहेत. तर काही ठिकाणी साईडपट्ट्यांची कामे उरकली नाहीत. वास्तविक सव्वा कोटीहून अधिकचा निधी यात्रा निधी म्हणून शासन देते. मात्र पालिका कागदावरच कामे दाखवून निधी लाटायचे काम करत असते.

याबाबत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले की, प्रशासन सध्या ठोस पावले उचलत नाही. प्रांताधिकारी फक्त बैठका घेत आहेत. स्वतः उभे राहून यापूर्वीचे प्रांताधिकाऱ्यांनी अतिक्रमणे वारी काळात काढली. मात्र सध्याचे प्रांत फक्त बैठकाशिवाय काहीच करत नाहीत. केवळ निविदा काढण्याचे काम प्रशासन करत आहेत.

नागरिकांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी सर्व शासकिय अधिकाऱ्यांना संपर्कासाठी फोन केल्यास प्रत्येकाने आपापले मोबाईल फोन उचलावेवत. मिस्डकॉल दिला तरी पुन्हा फोन करा असा आदेश देणारे प्रांताधिकारी आयुष प्रसाद स्वतः मात्र फोनवर प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the pimprichandwad road have many encroachment and potholes