पिंपरीचे आमदार अजितदादांसोबत; मावळचे पक्षासोबत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पिंपरीचे अामदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत असून, मावळचे अामदार सुनील शेळके हे पक्षासोबत आहेत.

पिंपरी (पुणे) : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची आजवरची वाटचाल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली होती. परंतु, अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना अजित पवारांनीच पुन्हा बनसोडे यांना उमेदवारी देत निवडूनही आणले आहे. त्यांचा फोन सकाळपासून बंद आहे. ते सकाळी सात वाजता मुंबईला गेले आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळी ते उपस्थित होते, असे समजते.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले सुनील शेळके मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले. अजित पवार यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. अपेक्षेनुसार आज अजित पवार यांच्या शपथविधीला ते हजर होते. मात्र, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत असल्याचे सांगितले. अजित पवार यांनाही मी मानतो. मात्र, शरद पवार यांनीही माझ्यासाठी प्रचार केला आहे. त्यामुळे मी पक्षासोबत राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri's MLA Anna bansode with Ajit pawar and Maval's MLA with NCP party