‘पिंकथॉन रन’मध्ये पुण्यातील बारा महिला

 ‘पिंकथॉन - मुंबई टू पुणे रन’मध्ये सहभागी झालेल्या बारा महिला.
‘पिंकथॉन - मुंबई टू पुणे रन’मध्ये सहभागी झालेल्या बारा महिला.

पुणे - ‘स्पिरीट ऑफ पिंकथॉन - मुंबई टू पुणे रन’मध्ये पुण्यातील बारा महिला सहभागी झाल्या. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी मुंबई ते पुणे हा १६५ किलोमीटरचा प्रवास धावून पूर्ण केला. या उपक्रमात ३३ ते ५२ वयोगटातील महिलांनी स्तनाच्या कर्करोगासोबतच महिलांचे आरोग्य व फिटनेस याविषयीही जनजागृती केली. 

‘पिंकथॉन’तर्फे आयोजित केलेल्या तिसऱ्या ‘स्पिरीट ऑफ पिंकथॉन - मुंबई टू पुणे रन’ची सुरवात अभिनेते व मॉडेल मिलिंद सोमण यांच्या हस्ते मुंबई येथील शिवाजी पार्क येथून मंगळवारी झाली. 

मुंबई ते पुणे या मार्गादरम्यान झालेल्या या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सलग तीन दिवस मुंबई ते पुणे धावून त्यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती केली. या उपक्रमाचा समारोप शनिवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार येथे झाला. पुण्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.

ब्यूटिशियन मृणाल इनामदार, शिक्षिका रश्‍मी लागवणकर, ग्राफिक आर्टिस्ट नीलिमा इंगळे, आयटी प्रोफेशनल मधुचंदा पटनाईक, फिटनेस कोच सईदा किझार, उद्योजिका तन्ना सचर, प्रीती म्हस्के, स्मिता मोरे, रेशम पिंपळे, सताविशा नातू, अमृता मोघे आणि गौरी शाळिग्राम यांनी यात सहभाग नोंदवला. 

याबाबत सोमण म्हणाले, ‘‘महिलांच्या फिटनेसबाबत नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजच्या जीवनशैलीत महिलांसाठी फिटनेस राखणे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे.’’

या उपक्रमासाठी आम्ही बारा जणींनी नऊ महिने मेहनत केली. हा प्रवास सोपा नव्हता; पण आत्मविश्‍वासाच्या जोरावर आम्ही प्रवास पूर्ण करू शकलो. विविध क्षेत्रांतील महिलांनी एकत्र येऊन, स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती केली. मी करू शकते, तर तुम्हीपण करू शकता, हा संदेश घेऊन आम्ही धावलो.
- रेशम पिंपळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com