बिबवेवाडीतील पाण्याची पाईप लाइन फुटून हजारो लिटर पाणी गेले वाहून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The pipeline on Swami Vivekananda Marg at Bibwewadi burst and thousands of liters of water were wasted

स्वामी विवेकानंद मार्गावरील बिबवेवाडी गावठाण कमानी समोर पाण्याची मुख्य पाईप लाइन फुटून हजारो लिटर पाणी वाहून गेले.

बिबवेवाडीतील पाण्याची पाईप लाइन फुटून हजारो लिटर पाणी गेले वाहून

बिबवेवाडी (पुणे) : स्वामी विवेकानंद मार्गावरील बिबवेवाडी गावठाण कमानी समोर पाण्याची मुख्य पाईप लाइन फुटून हजारो लिटर पाणी वाहून गेले. दिड फ़ूट व्यासाची भद्रावती पाईप आहे. पाईप लाइन फुटल्याने गावठाण व लगतच्या परिसरातील पाणी पुरवठा खंडीत झाला असून गुरुवारी सायंकाळी उशीर सूरु होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पाईप लाइन फुटून रस्ता व पदपथ उखडला होता, भद्रावती पाईप लाइन खूप जुनी असून तीचा व्यास व सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पाईप लाइनचा व्यास यामध्ये फरक असल्याने या पाईप लाइनची दुरुस्ती करताना वेळ लागत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी गुंजाळ यांनी सांगितले.


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top