पुणे : एफसी रोडवर पोलिसालाच दाखविले पिस्तूल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

शिवाजीनगर पोलिसांकडून दिवसभर चौकशीचे काम सुरू होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही खरोखर असा प्रकार घडला आहे का?, याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. 

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानेश्‍वर पादुका चौकात रविवारी रात्री मद्यपान केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास किरकोळ वादातून एकाने पिस्तूल दाखविल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

#Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ)

शिवाजीनगर पोलिस वसाहतीत संबंधित पोलिस कर्मचारी राहतो. त्याची रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने त्याने मद्यपान केले होते. त्यानंतर रात्री तो चहा पिण्यासाठी ज्ञानेश्‍वर पादुका चौकातील एका टपरीवर गेला. त्यावेळी त्याच्यासमवेत एक जण चहा घेत होता. त्या वेळी दोघांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसाला त्याच्याकडील पिस्तूल दाखविले. या प्रकारानंतर पोलिसाने नियंत्रण कक्षासह अधिकारी व त्याच्या मित्रांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसाने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. मात्र, पोलिसाची तपासणी केल्यानंतर त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. 

बाद तिकिटांचा रेल्वे प्रवाशांना फटका 

दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांकडून दिवसभर चौकशीचे काम सुरू होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही खरोखर असा प्रकार घडला आहे का?, याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. 

विमानाच्या ३०० प्रवाशांना तांत्रिक बिघाडामुळे फटका

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pistol was shown to the police on FC Road at Pune