गावठी पिस्तुलासह 16 मोबाईल जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेतील युनिट एकच्या पथकाने गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह अटक केली. युनिट दोनने रात्री घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

उमेश बाळासाहेब काळभोर (वय 35, रा. धायरीगाव) याला पिस्तुलासह अटक केली, तर प्रमोद प्रकाश डवरी (25, रा. काळेवाडी गावठाण) आणि राहुल दत्तात्रेय जाधव (22, काळेवाडी) अशी घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांचे पथक गस्तीवर होते, त्या वेळी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाजी मंडईत एक जण पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकून उमेश काळभोर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याविरोधात खुनासह अन्य गंभीर गुन्हे असून, तो अडीच वर्षे येरवडा कारागृहात शिक्षा भोगून नुकताच बाहेर आला आहे.

घरफोडी करणारे काळेवाडी येथील दोन गुन्हेगार पवनानगर येथील ज्योतिबा उद्यान परिसरात थांबल्याची माहिती पोलिस हवालदार राजकुमार तांबे आणि अतुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता डबरी याच्या खिशात चोरीचा मोबाईल आढळला. चौकशीदरम्यान आरोपींच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीचे 16 मोबाईल आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

Web Title: pistols seized with 16 mobile phones