अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पिठ गिरणी वाटप

सुदाम बिडकर
शनिवार, 21 जुलै 2018

पारगाव (पुणे) : पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात व जिल्हा विकास कामात वेगळ्या वळणावर नेण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले. 

पारगाव (पुणे) : पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात व जिल्हा विकास कामात वेगळ्या वळणावर नेण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले. 

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व अनिलभाऊ वाळुंज युवा प्रतीष्ठाण यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गरीब व गरजु 20 महीलांना पिठाच्या गिरणीचे विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विविध विकास कामांचे भुमीपुजने करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक दौलत लोखंडे, उपसभापती नंदाराम सोनावले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, उत्तम थोरात, रामचंद्र ढोबळे, माऊली आस्वारे, टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे, लाखणगावचे सरपंच दस्तगीर मुजावर, प्रशांत हिंगे, रामदास जाधव, सरपंच जयसिंग पोंदे, पोपट रोडे, संतोष वाळुंज, महेंद्र पोखरकर, संदिप पोखरकर, अमीत दौण्ड, सचिन जाधव, मनोज रोडे उपस्थीत होते.

प्रस्ताविक करताना खरेदी विक्रि संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले मागील दहा वर्षाच्या काळात पोंदेवाडी परिसरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन 16 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत, जिल्हा परिषदेच्या विविध विभागातुन प्रत्येक कुटुंबापर्यंत वैयक्तीक लाभाच्या योजणा पोचविणाचे काम केले 14 गरीब कुटुंबाच्या घरकुलसाठी जिल्हा परिषदेने प्रत्येकी एक लाख रुपये मंजुर केल्याचे त्यांनी सांगितले.

विवेक वळसे पाटील पुढे म्हणाले राज्यात सरकार कोणाचेही असले तरी दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या कामातुन उभी केलेल्या प्रतीमेमुळे तालुका तसेच परिसरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासत नाही. अजीत पवार यांची राज्याच्या मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु असुन आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहान केले.
सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.   

Web Title: pith girani distribution on the occasion of ajit pawar birthday