यश मिळविण्यासाठी वेळेचे नियोजन करा- डॉ. हतवळणे

राजकुमार थोरात
बुधवार, 20 जून 2018

वालचंदनगर : विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी वर्षभराच्या आभ्यासाच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अरुण सदाशिव हतवळणे यांनी व्यक्त केले. कळंब (ता.इंदापूर) येथे व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. 

यावेळी हतवळणे यांनी सांगितले की, परीक्षाजवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मात्र असे न करता सुरवातीपासुन मुला-मुलींसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करावे. परीक्षेमध्ये यश मिळविणे अंत्यत सोपे आहे. सुरवातीपासुन आभ्यासाच्या वेळेचे नियोजन करावे. दिवसामध्ये किती तास आभ्यास करावा याचे छोटेसे वेळापत्रक तयार करुन घ्यावे. गोखमपट्ठी करत बसण्याऐवजी जास्तीजास्त वाचन व सरावावरती भर द्यावा.

जास्तीजास्त वेळ आभ्यासामध्ये घालविण्याचा प्रयत्न करावा. जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नसते. मात्र यशासाठी कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी ही महत्वाची असते. १९८९ व  १९९१ मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये डॉ. हतवळणे यांच्या मुलांनी पुणे विभागामध्ये प्रथम क्रंमाक मिळविला होता. यावेळी फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, प्राचार्य संदीप पानसरे, के.बी.गवळी   उपस्थित होते.

Web Title: Plan time to achieve success - Dr. Hatvalne