विमानसेवा दुसऱ्या दिवशीही ‘जैसे थे’

Airport
Airport

पुणे - दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे पुण्यावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानांना सलग दुसऱ्या दिवशीही फटका बसला. रविवारी मध्यरात्रीनंतर आणि सोमवारी दिवसभरात लोहगाव विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या सुमारे १५ उड्डाणांना उशीर झाला. अनेक विमानांना सुमारे दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

प्रदूषित हवेमुळे दिल्लीत दृश्‍यमानता कमी असून, सायंकाळनंतर ती आणखी कमी होत जाते, त्यामुळे विमान सेवेला फटका बसत आहे. रविवारी पुण्याहून दिल्लीला जाणारे एक विमान रद्द केले होते, तर काही उड्डाणांना उशीर झाला. सोमवारी पहाटे दोन वाजून १० मिनिटांनी उडणारे विमान एक तास २६ मिनिटे विलंबाने उडाले, ते पहाटे चार वाजून २० मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना झाले. 

एअर एशियाचे मध्यरात्री दीड वाजता नियोजित असलेले विमान दोन तास २१ मिनिटे उशिरा उडाले. सकाळी साडेसात वाजताचे स्पाइसजेटचे (एसजी ८९३७) विमान एक तास १८ मिनिटे, इंडिगोचे (६ई- ६५७१) एक तास १३ मिनिटे, इंडिगोचेच दुसरे विमान (६ई- १४८) एक तास ५६ मिनिटे, स्पाइसजेटचे (एसजी ८१८४) विमान एक तास चार मिनिटे, एअर एशियाचे (७३२) विमान १ तास ४० मिनिटे विलंबाने उडाले. याबरोबरच अन्य काही विमानांना १५ ते ३० मिनिटे विलंब झाला, दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

आम्ही अनेक तास विमानतळावर अडकून होतो. प्रशासनाची कोणतीच मदत आम्हाला मिळत नव्हती. मी गरोदर असूनही मला खाद्यपदार्थ व आवश्‍यक मदत मिळू शकली नाही.
- मयूरी जोशी, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com