वळसे पाटील साहेंबामुळे आंबेगावचा नियोजनबध्द विकास - विवेक वळसे पाटील 

सुदाम बिडकर
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पारगाव - नियोजनबध्द विकास काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यातुन 10 ते 12 वर्षात आंबेगाव तालुक्याची झालेली प्रगती होय असे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.

पारगाव - नियोजनबध्द विकास काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यातुन 10 ते 12 वर्षात आंबेगाव तालुक्याची झालेली प्रगती होय असे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.

रोडेवाडीफाटा (पोंदेवाडी) ता. आंबेगाव येथे आज शुक्रवारी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या 125 कोटी रुपये खर्चाच्या बेल्हा शिक्रापूर या रस्त्याचे भूमिपूजन विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सभापती उषा कानडे, भिमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, माऊली अस्वारे, बाळासाहेब घुले, जिल्हा दुध संघाचे संचालक दौलत लोखंडे, मनोज रोडे, संजय गोरे, अशोक आदक, आदेश गाडे, रामदास वळसे पाटील, पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज, उपसरपंच संदेश पोंदे, लाखणगावचे सरपंच दस्तगीर मुजावर, प्राजक्ता रोडे, संतोष टाव्हरे, संदिप पोखरकर, महेंद्र पोखरकर, बाळशिराम वाळुंज उपस्थित होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले आपल्या परिसरात सुमारे 300 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे होत आहे. रस्त्यामुळे रहदारीत वाढ होऊन विविध व्यवसायाच्या माध्यमातुन परिसराचा विकास होणार आहे.

विष्णु हिंगे पाटील भाषणात म्हणाले या भागाच्या खासदारामुळे विकास तर झालाच नाही. परंतु, विमानतळ गेल्याने खुप मोठे नुकसान झाले आहे पुणे नाशिक रेल्वेचे कशातच काही नाही. फक्त आश्वासने भविष्यात देशाचे बदलते राजकारण पाहता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाला संधी असुन, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विकासावर विश्वास दाखवुन त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अनिल वाळुंज यांनी केले सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले. 

Web Title: Planning for the development of Ambegaon due to Walse Patil - Vivek Walse Patil