आंबेगावकरांसाठी एक हजार बेड्सचे युध्द पातळीवर नियोजन...

valse patil.jpg
valse patil.jpg

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टर,परिचारिका, उपकरणे, औषधे रुग्णांसाठी जेवण, नाश्ता आदी सुविधांसह एक हजार बेड उपलब्ध होतील.असे नियोजन प्रशासनाने युध्द पातळीवर करावे. त्यासाठी खासगी डॉक्टरांची व खासगी हॉस्पिटलची मदत घ्यावी. भीमाशंकर हॉस्पिटल कोविड उपचार रुग्णालय म्हणून कार्यरत करावे, असे आदेश राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे कोविड १९ आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. जिल्हाअधिकारी नवल किशोर राम, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, संचालक विनायकराव तांबे, प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी, अपर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंदाराणी पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ”सुविधा मिळत नसल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ही बाब मनाला दु:ख देणारी व गंभीर आहे”. कोरोना निर्मुलनासाठी ५० लाख रुपये निधी दिलेला आहे. निधी कमी पडू देणार नाही. तालुकास्तरावर आवश्यक ते वैद्यकीय साहित्य तातडीने खरेदी करावे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी. मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती विभाग व डायलेसिस उपचार विभागावर कोणताही परिणाम होणार याची दक्षता घ्यावी. शेतीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते न मिळाल्यास होणारे परिणाम प्रशासनाने समजून घेऊन मार्ग काढावा. लॉकडाउन शिथिल केला म्हणजे कोरोना संपला असा अर्थ काढू नये. जनजागृती झाली पाहिजे. पोलिसांची भीती कायम राहिली पाहिजे. खासगी हॉस्पिटल व डॉक्टरांना देखील नियमानुसार मानधन दिले जाईल. कोविड निर्मुलनाच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांनी निधीची मागणी करावी.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड निर्मूलनाचे काम आंबेगाव तालुक्यात उत्तम झाले आहे. अन्य तालुक्यापेक्षा हा आजार रोखण्याचे प्रभावी काम येथे झाले आहे. पोलिस, आरोग्य, पंचायत समिती, महसूल यांनी चांगले काम केले आहे. आत्तापर्यत एकूण ८३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ४८ जण बरे झाले आहेत. ३२ जणांवर उपचार सुरु आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बेडची संख्या एक हजारांपर्यत व सर्व सुविधा दिल्या जातील. खासगी डॉक्टर व हॉस्पिटलचे सहकार्य घेऊ. २० ते ४० वयोगटातील रुग्ण आढळून आले आहे. तरुणांचा संचार वाढू नये म्हणून पोलिस यंत्रणेने कार्यवाही करावी. संसर्ग पूर्णपणे थांबला पाहिजे. महसूल खात्याने ७/१२ दुरुस्ती, वारस सुनवणी ही कामे सुरु करावीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. सचिन गाडे, डॉ. सुनील खिवसरा, डॉ. नरेंद लोहकरे, डॉ. हर्षद शेटे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. महेश गुडे, डॉ. सौरभ गुजराथी, डॉ लीना गुजराथी आदींनी चर्चेत भाग घेतला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भीमाशंकर, उपजिल्हा व गेटवेल हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com