सहकारी संस्थाकडून आगर-अमरापूरला वृक्षारोपण

दत्ता म्हसक
रविवार, 8 जुलै 2018

जुन्नरच्या सहायक निबंधक यशवंती मेश्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जुन्नर - अमरापूर व आगर ता. जुन्नर येथील  विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. 

जुन्नरच्या सहायक निबंधक यशवंती मेश्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नारळ व विविध प्रजातीच्या जवळपास दीडशेहून अधीक वृक्षांची लागवड करण्यात आली. अमरापूर सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कवडे, आगर सोसायटीचे अध्यक्ष भाऊ भास्कर, विश्वास काळे, शिवाजी भास्कर, उमेश जाधव, कैलास कवडे, निवृत्ती महाबरे, सचिव संतोष सदाफुले, प्रसाद राऊत, प्रभाकर भास्कर, ई डी माळवे, संतोष भुजबळ, निलेश धोंगडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

जिल्हा बँकेचे अधिकारी सुभाषराव कवडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Plantation to Agar Amrapur from Cooperative Society

टॅग्स