स्वामी विवेकानंद प्रशालेच्या वतीने वृक्षारोपण

मिलिंद संधान
गुरुवार, 19 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) - दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेतील हरित सेना, स्काऊट गाईड व आरएसपी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पवना नदी काठावर 40 देशी झाडांची लागवड केली. 

प्राचार्य रामचंद्र गोंटे, पर्यवेक्षक व जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे, प्रकाश राऊत, रामदास पोळ, अनिल पाटील, गंगाधर पवार, रामेश्वर होनखांबे यांच्यासह नव्वद विद्यार्थी यात सहभागी झाले होते. पावसाच्या सरीवर सरी येत असतानाही विद्यार्थ्यांनी नदी काठावर टिकाव व फावड्याच्या सहाय्याने खड्डे घेत झाडे लावली. कडुनिंब, पिंपळ, साग या सारख्या दीर्घायुषी व पशुपक्ष्यांसह असंख्य किटकांना संरक्षण देणाऱ्या झाडांची यावेळी लागवड करण्यात आली. 

ऐरवी वर्गात शिक्षकांच्या धाकाखाली अभ्यासात मग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मात्र पाऊसांच्या सरीत भिजण्याच्या आनंदाबरोबर पर्यावरण पुरक गाणी म्हणत वृक्षारोपण केले.

Web Title: Plantation on behalf of Swami Vivekananda School