चावंड किल्ल्यावर वृक्षारोपण; पर्यावरण जनजागरण व प्लॅस्टिक मुक्त अभियान 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 24 जुलै 2018

भूगोल फाउंडेशनच्या वतीने जुन्नरमध्ये वनविभागाच्या सहकार्यातून पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती फेरी काढून माहिती पत्रके वाटली. पर्यावरण संरक्षणाचे फलक हातात धरुन रॅली काढुन स्थानिक लोकांचे प्रबोधन केले. 
 

जुन्नर : पिंपरी चिंचवड,पुणे येथील भूगोल फाउंडेशनच्या वतीने जुन्नर जवळील किल्ले चावंड (प्रसंनगड) दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून भूसंवर्धनाकडे प्लॅस्टिमुक्त चावंडगड व वृक्षारोपण मोहीम राबविली.

भूगोल फाउंडेशनच्या वतीने जुन्नरमध्ये वनविभागाच्या सहकार्यातून पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती फेरी काढून माहिती पत्रके वाटली. पर्यावरण संरक्षणाचे फलक हातात धरुन रॅली काढुन स्थानिक लोकांचे प्रबोधन केले. 

गड परिसर व पायथ्याशी स्थानिक लोकांचे प्रबोधन केले त्यांच्या मदतीने गावात व गडाच्या पायथ्याशी ५६ देशी टिकावू व भरपुर आॅक्सिजनची निर्मीती करणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण केले. गडाच्या पायथ्याशी व गडावर स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत दोन पोती प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करून तो गडाच्या पायथ्याशी आणून त्याची विल्हेवाट लावली. गडावर जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्लॅस्टिक बाॅटल थर्मोकोलचा कचरा गोळा करण्यात आला ऎतिहासिक वास्तुचॆ जतन भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. गडावर जाणाऱ्या वाटेवरही वृक्षारोपण केले. वृक्षसंवर्धनाची जबाबदारी गडाच्या पायथ्याशी असलेले चावंडचे सरपंच त्यांचे सहकारी व वनविभाग यांनी घेतली.  संस्थेच्या वतीने अशी मोहीम प्रत्येक महिन्यात एका किल्ल्यावर राबवली जाते.

भूगोल फाउंडेशनने शिवनेरी किल्ल्यापासुन या मोहिमेस सुरवात केली होती. आजपर्यंत शिवनेरी,लोहगड, पुरंदर, राजगड, तोरणा, तिकोणा, सिंहगड, तुंग, कोरीगड व चावंड येथे स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच अभियान राबवण्यात आले आहे. 

यावेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे, वनपाल शिवाजी सोनवणे, वनरक्षक रमेश खरमाळे, तृप्ती बारमुख , वनिता वडेकर, वैभव वाजे, सरपंच रामा भालचीम, हनुमंत उतळे,आकाराम कवडे, लक्ष्मण वाळुंज, भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ  मार्गदर्शक विठ्ठलनाना वाळूंज, निकुंज रेंगे, अविनाश खोसे,सुनील काटकर, अरविंद देवकर,बाळासाहेब गरुड, संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघाचे जगन्नाथ माने, विठ्ठल वीर, कर्नल तानाजी अरबुज, आझाद हिंद मित्र मंडळ काळेवाडी, मंचर येथील जिज्ञासा महिला विकासाच्या सविता सैद, आशा बो-हाडे, अक्षदा पडवळ इत्यादी संस्था व त्यांचे सदस्य सहभागी झाले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता. 

Web Title: Plantation at Chavand Fort Environmental awareness and Plastic free campaign