पर्यावरण दिनी भोर पोलिसांकडून वृक्षारोपन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

शिसव, करंज, लिंब, साग, पिंपळ, उंबर, अशोक व बकुळ आदी प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यावेळी भोरचे पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार तडाके, यांनी हवालदार प्रदीप नांदे, शिवाजी काटे, अनिल हिप्परकर, अंकुश अहिवळे, रोबोकॉब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, प्रशिक्षक शैलेश शितोळे, सूर्यकांत किंद्रे, चंद्रकांत जाधव, होमगार्डचे जवान आदींसह एम.एस.सी.आय.टी कोर्सचे विद्यार्थी उपस्थित होते. 

भोर (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोर पोलिस ठाण्याच्या 
परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. भोर पोलिस ठाणे आणि एम. एस. सी. आय. टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्र असलेल्या 'रोबोकॉब कॉम्प्युटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस ठाण्याशेजारील मौदानाच्या सभोवताली दीडशे रोपांची लागवड करण्यात आली. 

यामध्ये शिसव, करंज, लिंब, साग, पिंपळ, उंबर, अशोक व बकुळ आदी प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यावेळी भोरचे पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार तडाके, यांनी हवालदार प्रदीप नांदे, शिवाजी काटे, अनिल हिप्परकर, अंकुश अहिवळे, रोबोकॉब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, प्रशिक्षक शैलेश शितोळे, सूर्यकांत किंद्रे, चंद्रकांत जाधव, होमगार्डचे जवान आदींसह एम.एस.सी.आय.टी कोर्सचे विद्यार्थी उपस्थित होते. 

पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण साखळीत मनुष्य आणि वनस्पती यांचे महत्व सांगितले. तर प्रा. विजय जाधव यांनी पर्यावरणपूरक औषधी झाडे, हवामान स्वच्छ ठेवणारी झाडे, १२ तासांहून अधिक काळ प्राणवायू देणारी झाडे, शेतजमिनीची सुपिकता वाढवणारी झाडे, घराभोवती लागवड करण्यास योग्य झाडे आणि सरपणासाठी उपयुक्त झाडे यांच्याविषयी मार्गदर्शन केले. पोलिस आणि विद्यार्थ्यांनी लागवड केलेली झाडांचे संगोपण करण्यासाठीचे नियोजन केले.

Web Title: Plantation from Environment Day