वनविभागाच्या वतीने पर्यावरण दिनाचे निमित्त वृक्षारोपण  

दत्ता म्हसकर
मंगळवार, 5 जून 2018

जुन्नर - जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्ताने आज मंगळवार ता.5 रोजी जुन्नर वनविभागाचे वतीने पर्यावरण जनजागृत्ती फेरी व वृक्षारोपण करण्यात आले. 
येथील वनविभागाचे कार्यालयापासून जुन्नर शहरातून फेरी काढण्यात आली.

वनविभागाचे कार्यालय ते शंकरपुरा पेठ, जुन्नर नवीन बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या शिवराई संकुल येथे फेरीची सांगता झाली. या फेरीत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शिवराई संकुल येथे पिंपळ, चिंच, सीताफळ, आवळा आदी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. 

उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहायक उपवनसंरक्षक युवराज मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, डॉ अजय देशमुख, महेंद्र ढोरे, वनरक्षक,वनपाल, शिवाजी ट्रेलचे विनायक खोत, यश म्हस्करे आदी उपस्थित होते. 

Web Title: Plantation of Environment Day on behalf of Forest Department